मुंबई: गणेशोत्सवाचे आकर्षण भारतीयांसह परदेशातील नागरिकांनाही असते. या काळात अनेक परदेशी नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रात हजेरी लावतात. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश असतो. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने आज प्रतिष्ठापनेच्या दिवशी बाप्पाचा आशिर्वाद घेतला. मुंबईच्या सायन येथील जीएसबी मंडळाच्या गणपतीला त्याने भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले.

ब्रेट ली याला भारतीय संस्कृतीचे विशेष आकर्षण आहे. यापूवीर्ही भारतीय वेशातील त्याचे फोटो समोर आले होते. त्याचप्रमाणे आजही बाप्पाच्या दर्शनाला आलेला ब्रेट ली याने मोतीया रंगाचा झब्बा-पायजमा घातला होता. तसेच त्याने भारतीय परंपरेप्रमाणे नमस्कार केल्याचेही यामध्ये दिसत आहे.

मुंबईतील एक नामांकित गणपती म्हणून जीएसबीचा गणपती ओळखला जातो. श्रीमंत आणि दानशूर अशी या मंडळाची विशेष ओळख आहे. या गणपतीला यंदा 70 किलोहून अधिक सोन्याचे दागिने घालण्यात आले आहेत. तर 300 किलोहून अधिक चांदीची सजावट वापरण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)