जीएसटी : 26 महापालिकांना 1436 कोटी वितरित

मुंबईला सर्वाधिक 699 कोटीचा निधी
मुंबई – राज्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर महापालिकांचा बुडणारा महसूल राज्य सरकारला भरून द्यावा लागतो. जुलै महिन्याच्या भरपाईपोटी राज्य सरकारने 26 महापालिकांना 1 हजार 436 कोटी रूपयांचे अनुदान वितरित केले आहे. यामध्ये मुंबई महापालिकेला सर्वाधिक 699.13 कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे.
संपूर्ण देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारण्यात येणारा प्रवेशकर, जकात, स्थानिक संस्था कर, उपकर तसेच इतर सर्व कर बंद करण्यात आले आहेत. या करांच्या नुकसानभरपाईपोटी राज्य सरकार महापालिकांना निधी देते. त्यानुसार राज्यातील 26 महापालिकांना जुलै महिन्याच्या नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारने 1436.16 कोटी रूपयांचा निधी वितरित केला आहे. यानुसार मुंबई महापालिकेला सर्वाधिक 699.13 कोटींचा निधी मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असा मिळाला निधी
नवी मुंबई-85.43, ठाणे-60, कल्याण-डोंबिवली-14.18, उल्हासनगर-13.93, भिवंडी-निजामपूर-19.39, वसई-विरार – 25.10, मिरा-भाईंदर -13.81, सांगली -11.68, सोलापूर-15.38, कोल्हापूर -10.52, पिंपरी-चिंचवड-125.57, पुणे-131.06,अहमदनगर-6.84, जळगाव-9.22, धुळे-7.66, मालेगाव -12.03, नाशिक-72.83, नांदेड-वाघाळा-6.10, लातूर-1.12, परभणी-1.45, औरंगाबाद-21.12, अकोला-5.36, अमरावती-9.79, चंद्रपूर – 4.89 आणि नागपूर – 52.57 कोटी रूपये इतका निधी मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)