जीएसटी सुरळीत होण्यासाठी तीन महिन्याचा काळ लागेल

नवी दिल्ली, दि. 20- रिटेलर्सकडे जून्या कराच्या आधारावरील जूना माल आहे. आता 1 जुलैपासून नवी कररचना अंमललात येणार आहे. त्यामुळे दिर्घ काळ टिकणाऱ्या काही ग्राहकोपयोगी वस्तूचे दर बदलणार आहेत. यातून मार्ग काढण्याच रिटेलर्स प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जीएसटीनुसार कामकाज सुरळीत होण्यासाठी तीन महिनाचा काळ लागणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारानी सांगीतले आहे.

पॅनासोनीक इंडियाचे अजय सेठ यानी सांगीतले की विक्रते नवी कर प्रणाली स्विकारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर त्यांना त्यांच्याकडे असलेला मालही संपविण्याचा प्रयत्न करायचा आहे. आम्ही त्याना या कामी मदत कारीत आहोत. त्यासाठी ग्राहकांना काही प्रमाणात सवतली दिल्या जाणार आहेत. जर नवा माल पुढे चालू ठेवला तर त्यांच्या नफ्यावर 5 टक्‍क्‍यापर्यंत परिणाम होऊ शकतो असे गोदरेज अप्लायन्सचे उपाध्यक्ष कमल नंदी यानी सांगीतले.
जीएसटीमुळे बाजारपेठेत गोंधळ होणार नाही. आम्ही विक्रेत्याना सर्व माहीती देत आहोत. सध्या विक्रेते आणि आणि आम्ही आहे त्या वस्तू 1 जुलैपुर्वी विकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)