जीएसटी संकलन वाढण्याबाबत अर्थमंत्रालय आशावादी

नवी दिल्ली -सरकारने अगोदर जाहीर केल्याप्रमाणे आता रविवारपासून राज्यात वाहतूक करताना ई- वे बिलाची गरज लागणार आहे. त्याचबरोबर 15 एप्रिलपासून वाहतूक करताना ही तरतूद लागू होणार आहे. यामुळे जीएसटी संकलनात वाढ होईल, असे अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांना वाटते. यामुळे करभरणा टाळणे शक्‍यता होणार नसल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात सुरुवातीलाच ई- वे बिल येणार होते. मात्र, या यंत्रणेत काही चुका आढळल्यानंतर याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली होती.

यातील चुका आता दुरूस्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्‍लेषण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे 1.05 कोटी व्यापारी आणि कंपन्यांना आता अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे. जीएसटीच्या कर संकलन सलग दुसऱ्या महिन्यात रोडावले आहे. फेब्रुवारीमध्ये 85,174 कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर जमा झाला आहे. तर गेल्या महिन्यात अवघे 69 टक्‍के विवरणपत्र दाखल झाले आहे. हा सरकारच्या दृष्टिकोनातूनू चिंतेचा विषय आहे.

अर्थखात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीतून जीएसटी महसुलाला लागलेली गळती स्पष्ट झाली आहे. जानेवारीमधील 86,318 कोटी रुपयांच्या तुलनेत फेब्रुवारीत सलग दुसऱ्या महिन्यात वस्तू व सेवाकर संकलन रोडावले आहे. 25 मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यंदा वस्तू व सेवाकर विवरणपत्र (जीएसटीआर 3बी) भरणाऱ्यांची संख्या 59.51 लाख नोंदली गेली आहे. एकूण अप्रत्यक्ष करदात्यांच्या तुलनेत हे प्रमाण 69 टक्‍के आहे.डिसेंबर 2017 नंतर सलग दुसऱ्या महिन्यात कर संकलन घसरते राहिले आहे.

फेब्रुवारीमधील एकूण जीएसटी संकलनामध्ये 14,945 कोटी रुपये हे मध्यवर्ती वस्तू व सेवाकर तर 20,456 कोटी रुपये हे राज्य वस्तू व सेवा कर म्हणून जमा झाले आहेत. या व्यतिरिक्‍त 42,456 कोटी रुपये हे राज्यांतर्गतचे व 7,317 कोटी रुपये हे भरपाई अधिभार म्हणून जमा झाले आहेत. 25 मार्च 2018 पर्यंत एकूण वस्तू व सेवा करदाते 1.05 कोटी नोंदले गेले आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)