जीएसटी संकलन वाढण्याबाबत सरकार आशावादी

नवी दिल्ली -वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये आतापर्यंत 1.03 कोटी व्यावसायिकांनी नोंदणी केली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. 2 मार्चच्या आकडेवारीनुसार 1,03,99,305 करदात्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
यामध्ये 64.42 लाख करदात्यांनी पूर्वीच्या करप्रणालीतून स्थलांतर करत जीएसटी स्वीकारला आहे. 39.56 लाख करदात्यांनी पहिल्यांदाच नोंदणी केल्याचे अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुल्का यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आगामी काळात करदात्यांची आणि कर संकलनाची आकडेवारी वाढणार आहे. भारतात जीएसटी हा कर नवा असल्यामुळे आणि त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे ही प्रणाली रुळण्यास उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आगामी काळात कर संकलन वाढेल, याबाबत सरकारला खात्री आहे.
जीएसटीप्रणाली स्थिर होण्यासाठी सरकारकडून व्यापारीपूरक निर्णय घेण्यात येत आहेत. जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ स्थिर झाली आहे. जीएसटीसंदर्भात माहिती आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी मदतकेंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलन 88,047 कोटी रुपये होते असे त्यांनी सांगितले. मात्र संकलनामध्ये घट होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)