जीएसटी संकलनात घसरण चालूच

नवी दिल्ली -कर विभागाणे अंग झटकून काम करूनही जीएसटी कर संकलनात घट चालूच आहे. फेब्रुवारीत फक्‍त 69 टक्‍के करदात्यांनी विवरण भरल्यामुळे 85174 कोटी रुपयाचा जीएसटी जमा होऊ शकला. जानेवारी महिन्यातही जीएसटीचे संकलन 86318 कोटी रुपये झाले होते. फक्‍त सुरुवातीच्या काही काळात कर संकलन वाढले होते.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देतांना कर तज्ज्ञांनी सांगितले की 1 एप्रिलपासून ई-वे बिलाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यासाठी सरकारने पुरेशी तयारी केलेली आहे. त्यामुळे एप्रिलपासून जीएसटीतून मिळणाऱ्या रकमेत भरीव वाढ होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)