‘जीएसटी’ वाट्यासाठी केंद्राला साकडे

पुणे – वस्तू आणि सेवा करामधील (जीएसटी) वाटा न मिळल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाला सध्या आर्थिक चणचण भेडसावत आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याने बोर्डाने थेट अर्थमंत्री कार्यालयात धाव घेतली असून अरुण जेटली यांना साकडे घालण्यात आले आहे.

वस्तू आणि सेवा कराचा वाटा न मिळाल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डातील विकासकामे अडचणीत आली आहेत. इतकेच नव्हे तर, बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन द्यायचे कसे? असा प्रश्‍न बोर्ड प्रशासनासमोर उभा आहे. बोर्डाला करातील वाटा मिळावा, यासाठी महापालिका, राज्यसरकार, केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालय या सर्वांनाच सातत्याने पत्रव्यवहार करूनही अजून बोर्डासमोरील अडचणींचा तिढा सुटलेला नाही. बोर्डातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी खासदार संजय काकडे यांची भेट घेऊन जीएसटी वाट्याविषयी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी “अर्थमंत्र्यांसोबत भेटीसंदर्भात प्रयत्न करेन,’ असे आश्‍वासन बोर्डाच्या प्रतिनिधींना दिले होते. त्यानुसार काकडे यांच्या पुढाकाराने बोर्ड प्रतिनिधींनी अर्थमंत्री जेटली यांची गुरूवारी दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. तसेच बोर्डाला या करामध्ये वाटा मिळावा, असे निवेदनही पत्राद्वारे दिले. यावेळी खासदार काकडे, बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियंका श्रीगिरी, नगसेविका रुपाली बिडकर, किरण मंत्री, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरककर, विनोद मथुरावाला आणि विवेक यादव हे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)