‘जीएसटी’ वगळूनही ‘श्रीं’च्या मूर्ती महागलेल्याच

मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्‍क्‍यांनी भाववाढ वाहतूक खर्च,

कच्च्या मालाच्या किंमती, मजुरी वाढली

पुणे – इंधन वाढीमुळे वाढलेले वाहतूक खर्च, प्लॅस्टिक बंदी, कारागिरांची वाढलेली हजेरी, कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमती, यामुळे यंदा श्रींच्या मूर्तींच्या किंमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

श्रावण संपताच तरूणाईला गणेश उत्सवाचे वेध लागते. त्यातच यंदा अधिक महिन्यामुळे गणेशोत्सव उशिराने म्हणजेच सप्टेंबर महिन्यात आला आहे. त्यासाठी मूर्तीकारांनी मूर्ती तयार करण्यासाठी आवश्‍यक साहित्यांची जुळवाजुळव मेपासून सुरू केली होती. मूर्तीसाठी लागणारी शाडूची माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, प्लॅस्टिक पेंट, वॉटर पेंट, काथ्या यांच्या जीएसटीमुळे वाढलेल्या किंमती कायम असून त्यामध्ये आणखी 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. याखेरीज, प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यानंतर शहरातील बहुतांश मूर्तीकारांनी मूर्तींचे संरक्षण करण्यासाठी दुप्पट भावाने प्लॅस्टिक पिशव्यांची खरेदी केली आहे. तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. याचाही परिणाम मूर्तींच्या किमतीवर झाला आहे. प्रत्यक्ष गणेश मूर्ती विक्रीला जीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे. तरीही कच्च्या वस्तू यापूर्वीच महागल्या आहेत. या वस्तू मूर्तीकारांनी पूर्वीच खरेदी केल्या आहेत.

यावर्षी माती आणि इतर साहित्यांमध्ये 20 ते 40 टक्के वाढ झाली आहे. याबरोबरच कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीच्या किंमती वाढणार आहेत.
– मयुर राजे, मूर्तीकार.


गेल्या वर्षी शाडूची एक फुटाची मूर्ती साधारणपणे तीन हजारांना मिळत होती; परंतु आता यावेळी तिच्या किमतीत 450 रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची एक फुटाची मूर्ती हजार रुपयांना मिळत होती. तिच्या किंमतीतही यामुळे 300 रुपयांची वाढ होणार आहे.
– केशव कुंभार, मूर्तीकार.


गेल्या वर्षी जीएसटी लागू झाल्यानंतर किंमतीत वाढ झाली होती. मात्र, यंदा त्यात प्लॅस्टिक बंदी आणि वाहतूक खर्चाची भर पडली आहे. त्यामुळे यंदा मूर्तींची भाववाढ झाली आहे.
– अक्षय खेडकर, मूर्तीकार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)