जीएसटी लागू करण्यासंदर्भात अरुण जेटली आशावादी

गांधीनगर – प्रस्तावित वस्तू व सेवा कराशी (जीएसटी) संबंधित सर्व प्रलंबित मुद्द्यांचा निपटारा केला जाईल. ही करव्यवस्था 1 एप्रिलपासून लागू केली जाईल, असा आशावाद केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी व्यक्त केला. जीएसटी परिषदेची आगामी बैठक 16 जानेवारी रोजी होत आहे. करदाता संस्थांवर अधिकार, तसेच अन्य काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल. परिषदेच्या मागील काही बैठकांत या मुद्द्यांवर तोडगा निघू शकला नव्हता.

व्हायब्रंट गुजरात संमेलनात बोलताना जेटली म्हणाले की, जीएसटीशी संबंधित बहुतांश मुद्दे निकाली काढण्यात आले आहेत. काही महत्त्वाचे मुद्दे अनिर्णित आहेत. येणाऱ्या काही आठवड्यांत या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न राहील. जेटली म्हणाले की, जीएसटी लागू करण्यासाठी जास्तीत जास्त मुदत सप्टेंबर 0 ही आहे. या व्यवस्थेत केंद्र आणि राज्य सरकारांचे बहुतांश कर समाविष्ट केले जातील. केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवाकर, तसेच राज्यांचे व्हॅट आणि विक्रीकर आदींचा त्यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)