जीएसटी राबविण्याची पद्धत अन्यायकारक

जेजुरीत खासदार सुळे यांचा व्यापाऱ्यांशी संवाद

जेजुरी- जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पध्दतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने जीएसटीतील व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या अटी दूर कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
जेजुरी येथे व्यापाऱ्यांच्या अडीअडचणीबाबत चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यापाऱ्यांनी अडचणी मांडल्या. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, राजेंद्र पेशवे, नगरसेवक अरुण बारभाई आदी उपस्थित होते. यावेळी जाहिरातातील वास्तवता प्रत्यक्ष दिसते का असा सवाल करून खासदार सुळे म्हणाल्या की, शेती मालाला भाव नाही, जाचक अटीमुळे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. फक्त जाहिरातबाजी करून दिशाभूल केली जात आहे.
जेजुरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली जागा वापरण्यासाठी देता येईल का याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करू. तेथे सध्या बाजार भरतो. बाजारातील व्यापारी व शेतकरी यांना तेथे सुविधा देता येतील असे सुळे यांनी सांगितले. जयदीप बारभाई, विठ्ठल सोनवणे, मेहबुब पानसरे, नारायण आगलावे, मोहन नाझीरकर यांनी यावेळी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष एन. डी. जगताप यांनी सूत्रसंचालन केले. राहुल घाडगे यांनी आभार मानले.

  • जेजुरी पालिकेच्या मोरगाव रस्त्यावरील असलेल्या गाळा धारकांची मुदत संपल्याने पालिकेने नव्याने लिलाव करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. बैठकीत या विषयावर लक्ष वेधण्यात आले. गेली अनेक वर्षे व्यवसाय करणारे व्यापारी व दुकानदार यानिमित्ताने अडचणीत येणार आहेत. त्यांच्यावर अन्याय आहे. व्यवहार आणि कायदा यांची सांगड घालून हा प्रश्न सोडविता येईल. त्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू.
    – सुप्रिया सुळे, खासदार 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)