जीएसटी’ बुडवणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा

जीएसटी’ बुडवणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा
35 लाख 37 हजारांचा बुडवला कर
पुणे, दि.22 – वस्तु व सेवा कर (जीएसटी) बुडवल्याप्रकरणी एका व्यापाऱ्याविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यापाऱ्याने 2012 या आर्थिक वर्षापासून आजपावेतो 35 लाख 37 हजार 460 रुपयांचा कर बुडवला आहे.
मेसर्स एस. पी. एन्टरप्रायजेसचे मालक संतोष अवदेश पांडे (चिंतामणी सोसायटी, देहुरोड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक राज्यकर आयुक्त सारिका देसाई यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आरोपीने त्याच्या व्यवसायाचा व्याज व दंड मिळून 2012 पासूनचा वस्तु व सेवा कर आजवर भरला नाही. याची एकूण रक्कम 35 लाख 37 हजार 460 रुपये इतकी आहे. या रकमेचा त्याने वैयक्तीक फायद्याकरीता वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पांडे याची ऑईलची एजन्सी असल्याचे पालिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लोहार तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)