जीएसटी नेटवर्कला मंजूरी नाही

जेटली: तरीही जीएसटी अंमलबजावणी होणारच

नवी दिल्ली, दि. 20- जीएसटी नेटवर्कला गृहमंत्रालयाने अजूनही सुरक्षाविषयक परवाणगी दिलेली नाही. मात्र तरीही जीएसटी कर संलनाच्या कामावर त्याचा काही परिणाम होणार नाही. 1 जूलैपासून या कराची अंमलबजावणी होणार असल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगीतले आहे.

जीएसटी नेटवर्क अगोदरच काम करीत आहे. त्या आधारावर उद्योजकांना क्रमांक जारी करण्यात आले आहेत. गृहमंत्रालय आपल्या पध्दतीने काम करीत आहे. तो प्रक्रीयेचा भाग आहे. काळाच्या ओघात गृहमंत्रालय जीएसटी नेटवर्कला सुरक्षा विषयक परवाणगी देईल असे त्यांनी सांगीतले.

घटना दुरूस्तीच्या माध्यामातून या कराला परवाणगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर कारणामुळे या कराच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. याबाबत केंद्र आणि राज्याचे मतैक्‍य झाले आहे. मात्र जीएसटी नेटवर्क या कंपनीला गृहमंत्रालयाने अजून परवाणगी दिलेली नाही. या कंपनीत भारत सरकारची 24.5 टक्के तर राज्याची 24.5 टक्के इतकी गुंतवणूक आहे. बाकी गुंवणूक बिगर सरकारी वित्त संस्थाची आहे. यामुळे डाटाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. अशी शंका भाजपाचे नेते सुब्रम्हन्यन स्वामी यांनी अनेक वेळा व्यक्त केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)