‘जीएसटी’ चुकवेगिरीचा संशय

अप्रत्यक्ष कर विभाग करणार तपशीलात चौकशी
नवी दिल्ली – जुलै ते सप्टेंबर कालावधीत जीएसटी नेटवर्कवर फाईल रिटर्नचे विश्‍लेषण करण्यात आल्यानंतर व्यावसायिकांनी 34 हजार कोटी रुपयांचा कर लपविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जीएसटी रिटर्न – 1 आणि जीएसटीआर 3 बीमध्ये विभिन्न आकडेवारी दाखविण्यात आल्याने व्यावसायिकांना नोटीस पाठविण्याची शक्‍यता आहे. जीएसटीआर – 1 चा वापर आता सूचना देण्यासाठी करण्यात येत आहे. शनिवारी झालेल्या जीसटी परिषदेच्या बैठकीत ही बाब समोर आली.

दोन रिटर्न दाखल करताना काही प्रमाणात अंतर ठेवण्यात आले आहे, त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. संशयास्पद लोकांविरोधात कारवाई करण्यासाठी काही व्यक्‍तिगत करदात्यांची सखोल माहिती गोळा करण्यात येणार आहे. जीएसटी रिटर्नमध्ये काही वस्तूंची किंमत मोठया प्रमाणात कमी दाखविण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात कर चोरी करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारकडून करचोरी रोखण्यासाठी काही निर्णय घेण्यात येत आहेत. मात्र ते अयशस्वी ठरत आहेत. या वस्तूंची किंमत शोधण्यासाठी इनव्हॉइस मॅचिंग आणि प्रकल्पातून सामान निघाल्याची संपूर्ण प्रक्रिया तपासण्यात येणार आहे. काही व्यावसायिकांच्या मते सरकार जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3बीमधील आकडेवारीची तपासणी करणार नाही, त्यामुळे माहिती देताना चुकीची देण्यात आली असे
सांगण्यात आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)