जीएसटी एका वर्षातच यशस्वी झाला – आधिया

अर्थव्यवस्थेचे औपचारीकरण झाले नसल्याच्या आरोपाचा इन्कार
नवी दिल्ली : जीएसटीमुळे आतापर्यंत तरी अर्थव्यवस्थेचे औपचारीकरण झाले नसल्याच्या आरोपाचा अर्थ मंत्रालयाने इन्कार केला आहे. वित्त सचिव हसमुख आधिया यांनी सांगितले, की जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचे औपचारीकरण वेगात होत आहे. तशी आकडेवारी उपलब्ध आहे. जीएसटी अगोदर अप्रत्यक्ष क्षेत्रात 60 ते 65 लाख करदाते होते. आता या संख्येत तब्बल 48 लाखांची भर पडली आहे. हे करदाते जीएसटीमुळे आले आहेत.

याला अर्थव्यवस्थेचे औपचारीकरण म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असे आधिया यांनी सांगितले. ते म्हणाले की, यातील 25 टक्‍के कर दाते कमी कर देतात. त्यामुळे ते वेळेवर विवरण भरण्याकडे दुर्लक्ष करतात. आता ही पध्दत रुळू लागली आहे. केवळ एकाच वर्षात जीएसटी रुळला आहे. करदात्याची संख्या आणि करसंकलन वाढत आहे. आता विवरण अधिक सुटसुटीत करण्यावर भर देण्यात येत असल्याचे आधिया यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कर सुधारणा होती. यात जवळजवळ डझनभर अप्रत्यक्ष कराचे एकत्रीकरण करण्यात आले. त्या अगोदर कर दात्यांना ते सर्व कर देण्यासाठी धावपळ करावी लागत होती. आता केवळ एकच कर भरल्यानंतर त्याची सुटका होत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामावर लक्ष देण्यास अधिक वेळ मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले.

या करामुळे भारत केवळ एक संयुक्त बाजारपेठ तयार झाला आहे. विविध राज्यातील वस्तू वेगात जात आहेत. त्यामुळे इंधनाचा खर्च कमी होत आहे. आतापर्यंत 1.11 कोटी कर दात्याची नोंदणी झाली आहे. कर संकलन वेगात वाढले आहे. यामुळे कर चुकवेगिरी वेगाने कमी होते आहे. त्यामुळे कर दात्यांचा आणि सरकारचाही फायदा होणार आहे. कंपन्याना त्यांचा माल वाहतून करण्यासाठी कमी अडचणी येत आहेत.

ते म्हणाले की, एवढी मोठी सुधारणा एवढ्या मोठया देशात राबवायची झाल्यास त्याला वेळ लागतो. आपण केवळ एक वर्षात एवढे मोठे काम करून दाखविले आहे. सुरुवातीला कर दात्यांना या नव्या यंत्रणेची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मोठा गोंधळ उडत होता. मात्र, आता सर्व करदात्यांकडे आवश्‍यक माहिती गेली आहे. त्यामुळे सर्व अडचणी कमी झाल्या आहेत. आता सरकार कोणत्या मुद्द्यावर भर देणार आह, असे विचारले असता ते म्हणाले की, यावर्षी आम्ही विवरण फक्त एक पानी करण्यावर भर देणार आहोत. त्यामुळे कर दात्यांना विवरण भरणे सापे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)