जीएसटी उद्योग – व्यवसायात अधिक पारदर्शकता

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या माजी चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांचा विश्‍वास
पुणे – कोणताही छोटा व्यवसाय किंवा उद्योग करीत असताना व्यवहारांमध्ये प्रत्येकाने पारदर्शकता ठेवणे आवश्‍यक आहे.व्यापारातील हीच पारदर्शकता सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाच्या फायद्याची असते. देशात सुरु झालेल्या जीएसटी व्यवस्थेमूळे उद्योग-व्यवसायात अधिकाधिक पारदर्शकता येणार आहे,असा विश्‍वास स्टेट बॅंक ऑफ़ इंडियाच्या माजी चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.

ग्राहक हा केंद्रबिदू मानून कार्य करणाऱ्या पुण्यातील ग्राहक पेठेला कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॉक्‍टिसेस चा 30 वा जमनालाल बजाज पुरस्कार मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी सीएसबीच्या अध्यक्ष कल्पना मुन्शी,पुरस्कार समितीचे चेअरमन विनीत भटनागर,सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.एन.श्रीकृष्णा,ग्राहक पेठेचे चेअरमन एस.आर.कुलकर्णी ,कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक ,संचालक परिमल लोखंडे ,अनंत दळवी,उदय जोशी,आदी उपस्थित होते. व्यापार आणि वितरण विभागातील पुरस्कार यंदा ग्राहक पेठेला प्रदान करण्यात आला. स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)