जीएसटी अधिक्षकासह पोलिसाला मारहाण

शिरवळ – ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याचा राग येवून चालकाने जीएसटी अधिक्षकास बेदम मारहाण केली. तसेच त्यास सोडवण्यास आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यासही मारहाण केली. वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधीक्षक अब्दुल जलील शेख हे कार्यालयीन कागदांची झेरॉक्‍स काढण्यासाठी कार्यालयाच्या खाली जात होते.

त्यावेळी एका ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा धक्का अब्दुल शेख यांना बसून ते खाली पडले. त्यानंतर कार्यालयाचे हवालदार व्ही. एन. अवघडे यांनी त्यांना उठवले. अब्दुल शेख यांनी ट्रॅक्‍टर चालक सुनील शांताराम चव्हाण याला ट्रॅक्‍टर चालवीत व्यवस्थित चालवत जा, असे सांगितले.

त्याचा राग येवून सुनील चव्हाण, ट्रॅक्‍टर मालक वसीम खान, रफिक खान यांनी अब्दुल शेख यांना बेदम मारहाण केली. हवालदार व्ही.एन.अवघडे हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही वसीम खान याने मारहाण केली. रफिक खान याने जीवे मारण्याची धमकी देत कमरेला असलेला चाकू घेऊन अवघडे यांच्या अंगावर धावून आला.

दरम्यान, घटनास्थळी जीएसटी विभागाचे निरीक्षक विनीत सिन्हा पोलिसंना घेऊन आले. यानंतर संशयीतांनी घटनास्थळा वरून पोबारा केला. अब्दुल शेख यांच्या खिशातील साहित्य व रोख रक्कम घेऊन ते पळून गेले असल्याची फिर्याद वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधीक्षक अब्दुल शेख यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी संशयीत चालकास अटक केली असता त्यास 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. तपास उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)