जीएसटीसाठी राज्यांना नुकसान भरपाई

नवी दिल्ली: केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीअंतर्गत राज्यांना महसुली भरपाई म्हणून मे 2018 पर्यंत 11 महिन्यांत 52,077 कोटी रुपये वितरित केले आहेत. जुलै 2017 पासून अमलात आलेल्या या नवीन अप्रत्यक्ष करप्रणालीत केंद्र आणि राज्याचे अनेक कर सामावण्यात आल्याने, राज्यांना गमवाव्या लागलेल्या कर महसुलाची भरपाई केंद्र सरकारने करण्याची ग्वाही दिली आहे.

जुलै 2017 ते मार्च 2018 या दरम्यान राज्यांनी भरपाईपोटी 48178 कोटी रुपये मिळविले तर एप्रिल-मे 2018 या दोन महिन्यांत आणखी 3,899 कोटी रुपये राज्यांना वितरित करण्यात आले. अंमलबजावणीपासून गेल्या 13 महिन्यांत जीएसटीअंतर्गत एकूण 11.3 लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. एप्रिल 2018 मध्ये गोळा झालेले 1.03 लाख कोटी रुपये हे आजवरचे सर्वाधिक मासिक संग्रहण आहे. अधिकाधिक करपालनासाठी जागृती आणि शिक्षण तसेच करचोरीला पायबंद घालण्यासाठी पावले टाकली जात असल्याचे कर विभागाने स्पष्ट केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)