जीएसटीला ‘मातोश्री’ बिल म्हणायला हरकत नाही-जयंत पाटील

मुंबई : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होत आहे. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झाले असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. जीएसटीवर चर्चेदरम्यान पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपवरही निशाणा साधला.
मुंबई महापालिकेला पैसे देताना काही ऑडिट घेणार का, कुठे किती पैसे जाणार, खर्च करताना पारदर्शी कारभाराबाबत काय, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय व्यवस्था आहे, हे जीएसटीत दिसत नाही, असे जयंत पाटील म्हणाले. शिवाय मुंबई महापालिकेला पैसे देण्यासाठी विरोध नसल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. मातोश्रीवर अष्टप्रधान मंडळासमोर सुधीर भाऊंनी प्रझेन्टेशन दिले. मुख्यमंत्री ज्या वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायला निघाले होते, त्याच वाघाच्या जबड्यात सगळे ओतायला निघाले. हे बिल मातोश्री वरून आले आहे त्यामुळे याला मातोश्री बिल म्हणायला हरकत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. शिवसेनेला राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत दुखवायचे नाही म्हणून सुधीर भाऊ मातोश्रीवर गेले असावे, असेही जयंत पाटील म्हणाले. सुधीर भाऊ मातोश्रीवर गेले याचे दुःख नाही, पण जे दस्ताऐवज घेऊन गेले त्याला आक्षेप आहे. सभागृहात मांडण्याआधी जीएसटीचा मसुदा मातोश्रीवर नेण्यात आला, हे परंपरेला धरून नसल्याचे पाटील यांनी यावेळी म्हटले. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर जायला निघाला होतात. आता वॉचमनची ड्युटी करत आहेत. आशिष शेलार तुम्ही पक्षासाठी एवढी मेहनत घेतली, 82 जागा आणल्या पण तुम्ही तिकडेच.. प्रसाद मात्र दुसऱ्यालाच, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)