जीएसटीमुळे दुध, चहा-कॉफीसारखे खाद्य पदार्थ होणार स्वस्त

नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर अंतर्गत बहुतांश वस्तूंवरील करांच्या दरावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती झाली आहे. दोन दिवसीय जीएसटी परिषदेत दररोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेने गुरूवारी 1211 वस्तुंच्या कर दरावर निर्णय घेतला आहे. यातील बहुतांश वस्तूंवर 18 टक्के कर लावण्यात आला आहे. सोने आणि विडीवर कराचा दर ठरवण्यावरून एकमत बनले नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जीएसटी परिषदेच्या पहिल्याच दिवशी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. कोणत्याही वस्तूंचे कर वाढवण्यात आलेले नाहीत. तर अनेक वस्तूंवरील कर हे यापूर्वीच्या दरापेक्षा कमी करण्यात आले असल्याचे जेटली यांनी सांगितले.

खोबरेल तेल, टूथपेस्ट आणि साबणासारख्या वस्तूंवर जीएसटीमध्ये 18 टक्के कर लागेल. तर साखर, चहा, कॉफी, खाद्य तेल आणि कोळशावर 5 टक्के कर लागेल. सुमारे 81 टक्के वस्तूंवर 18 टक्के किंवा त्याहून कमी कर लावण्यात आला आहे. केवळी 19 टक्के वस्तूंवर सर्वाधिक 28 टक्के कर लावण्यात आला असल्याची माहिती महसूल सचिव हंसमुख अधिया यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)