जीएसटीमध्ये कपात होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली, दि. 3 -सध्या जीएसटीमध्ये असणारी 12 आणि 18 टक्‍क्‍यांची करपातळी बदलण्याची शक्‍यता आहे. याऐवजी 14-15 टक्‍क्‍यांची नवीन पातळी त्याची जागा घेईल, असे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले. इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्‌स ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या जीएसटीसंदर्भातील परिषदेमध्ये ते बोलत होते.

जीएसटीमधून मिळणारे प्रति महिन्याचे करसंकलन 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्यावर नवीन करश्रेणीचा विचार करण्यात येईल. मात्र, या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून किमान 9 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. सध्या जीएसटीमध्ये 0, 5, 12, 18 आणि 28 अशी करपातळी आहे. यातील दोन वगळण्यात आल्यास ती चारवर पोहोचेल. सध्या जीएसटीमधील अनेक वस्तूंवरील करपातळी कमी करण्यात येत आहे. जीएसटी लागू झाल्यापासून एप्रिल या एकाच महिन्यात संकलन 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. सध्या केवळ भारतासह चार देशांमध्ये अनेक करपातळी आहे.
शनिवारी होणाऱ्या जीएसटी परिषदेमध्ये लहान डिजिटल पेमेन्ट्‌सवर सवलत देण्यासाठी निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)