जीएसटीतून ७.१९ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर जमा झालेला महसूल समाधानकारक झाला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने ट्विटरवरून दिली. जुलै २०१७ ते मार्च २०१८ या आठ महिन्यांमध्ये ७.१९ लाख कोटी जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू झाला आहे. जुलैमधील वसुली मिळून २०१७-१८ मधील जीएसटीचा एकूण महसूल  ७.१९ लाख कोटी रुपये होतो. यामध्ये १.१९ लाख कोटींचा सीजीएसटी, १.७२ लाख कोटींचा एसजीएसटी आणि ३.६६ लाख कोटींचा आयजीएसटी (आयातीवरील १.७३ लाख कोटी रुपये धरून) आहे. वित्त मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ या वित्त वर्षातील आठ महिन्यांच्या काळासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या भरपाईपोटी ४१,१४७ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक राज्यांमधील स्थानिक कर रद्द झाले होते. हे कर रद्द झाल्याने राज्यांच्या महसुलात घट आली होती. ही घट भरून काढण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचा हा निधी विविध राज्यांना वितरीत करण्यात येणार आहे. तर राज्यांना फेब्रुवारीपर्यंतची भरपाई देण्यात आली असून मार्च व एप्रिलची भरपाई बाकी आहे, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)