“जीएसटी’तून पारदर्शकतेचे दावे फोल

…ही तर जनतेची फसवणूक
सारडा म्हणाले, “जीएसटी’ प्रणाली व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी लागू करण्यात आली. यामुळे व्यवहारातील भ्रष्टाचार नष्ट होऊन, त्यामध्ये सुटसुटीतपणा आणि स्पष्टपणा येण्यास मदत होईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, नेमके याचे उलट चित्र आहे. जमा झालेला कर नेमका कोठून आणि किती प्रमाणात जमा झाला, याची माहितीच सरकारकडे नसेल, तर त्यांच्या दाव्यातील फोलपणा यातून स्पष्ट होत आहे. महत्वाचे म्हणजे देशातील 95 टक्के जनता वस्तू आनि सेवेच्या स्वरूपात हा कर भरत आहे. अशा परिस्थितीत जर वित्त विभागाकडेच याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध नसेल, तर ही जनतेची मोठी फसवणूक होत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांचा आरोप

पुणे – केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यांतर्गत मार्च अखेरपर्यंत सुमारे 85 हजार 174 कोटींचा कर गोळा झाल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले होते. मात्र हा यामध्ये कोणत्या क्षेत्रातून नेमका किती कर मिळाला, याची माहितीच अर्थमंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आले आहे. यामुळे सरकारच्या पारदर्शकता आणि स्पष्टपणाचे दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.

यासंदर्भात मंत्रालयाच्या महासंचालकांकडून जीएसटी माहिती विभागाला नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भातील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी दिली आहे.
सारडा यांनी अर्थमंत्रालयाच्या अर्थ विभागाकडे माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला होता. यामध्ये “जीएसटी’ अंतर्गत आतापर्यंत किती निधी जमा झाला आहे? राज्य आणि केंद्राला किती फायदा झाला, तसेच कोणकोणत्या क्षेत्रातील लोकांकडून किती प्रमाणात हा कर जमा झाला आहे? याची विचारणा करण्यात आली होती. सारडा यांच्या हा अर्ज अर्थ विभागाकडून माहिती विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, माहिती विभागाने सदर माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याची कबुली या अर्जात केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अर्थ मंत्रालयाच्या महासंचालकांनी अर्थ तसेच माहिती विभाग यांना नोटीस बजावत याविषयी सुनावणीसाठी बोलावले आहे. ही सुनावणी दिल्ली येथे होणार असून यावेळी अर्जदार सारडा यांनीही उपस्थित राहावे,असे कळविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)