जीएसटीच्या नावाने जास्त दरवाढ करू नका !

अर्थमंत्रालयाचा कंपन्याना ईशारा
नवी दिल्ली – जीएसटीचे दर सध्या ठरविले जात आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन कंपन्यानी आता किंवा जीएसटीच्या अंमलानंतर आवश्‍यकतेपेक्षा जास्त दर वाढ करू नये असा ईशारा अर्थमंत्रालयाने दिला आहे.
आवश्‍यकतेपक्षा जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न केल्यास या कंपन्याचे ताळेबंद पाहून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्‍यता महसूल सचिव हसमुख आधिया यांनी सूचीत केली आहे. सध्या तशी यंत्रना नाही. मात्र 1 जूलैनंतर अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्यामुळे कंपन्याच्या ताळेबंदाचा आढावा घेतला जाऊ शकतो असे त्यांनी सांगीतले. जीएसटीमुळे काही उत्पादनांचे किंवा सेवाचे कर कमी होणार आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होण्याची गरज आहे. त्याकडे सरकारचे लक्ष असणार असल्याचे त्यानी सांगीतले.
ते म्हणाले की 1 जूलैपर्यंत भरपूर वेळ आहे. सध्या जाहीर केलेल्या दराच्या आधारावर कंपन्याना आपल्या वस्तूच्या किमती ठरविण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्यामुळे त्यानी अंदाधूंद वाढ करू नये. कर कमी झाले असतील तर त्या वस्तूचे दर कमी होण्याची गरज असल्याचे त्यानी सांगीतले.
जीएसटी अंतर्गत नफ्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा विकसीत होणार आहे. मात्र सध्याही कोणी मोठी दर वाढ केल्यास याकडे कर विभागाचे बारीक लक्ष असणार असल्याचे त्यानी सांगीतले. कंपन्यानी या बदलात सरकारला सहकार्य करावे. अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा पर्याय खुला असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)