जीएसटीचे दर निश्‍चीत

शिक्षण, आरोग्यसेवा कराच्या कक्षेबाहेरच राहणार
सध्या 15 टक्के करांच्या कक्षेत असलेल्या सेवा मात्र महागणार
नवी दिल्ली – देशात येत्या जुलै महिन्यापासून जीएसटी कर पद्धती लागू होणार आहे. त्यात 5,12,18 आणि 28 टक्के या चार टप्प्यांमध्ये विविध वस्तु आणि सेवांवर कर लागू केला जाणार आहे. या करांच्या रचनेतून शिक्षण आणि आरोग्य सेवांना असलेली माफी यापुढेही कायम राहणार आहे. या कररचनेच्या संबंधात पत्रकारांना माहिती देताना अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले की दूरसंचार सेवा आणि अन्य वित्तीय सेवांवर मात्र 15 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्के इतका कर लागू केला जाणार आहे.सर्व वाहतूक सेवांवर 5 टक्के दरांनी कर आकारणी केली जाणार आहे. ही पाच टक्के कर आकारण उबेर ओला या सारख्या टॅक्‍सी सेवांनाही लागू राहणार आहे
नॉन एसी वाहतूक व्यवस्था करांच्या कक्षेतून वगळण्यात आल्या असून वातानुकलीत परिवहन सेवांना मात्र पाच टक्के दरांनी कर आकारणी केली जाणार आहे.मेट्रो, लोकल रेल्वे सेवा, धार्मिक पर्यटन अशांना करातून पुर्ण वगळण्यात आले आहे. इकॉनॉमिक क्‍लासने विमान करणारांवर पाच टक्के दराने तर बिझीनेस क्‍लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर 12 टक्के दराने कर आकारणी केली जाणार आहे.
करमणुक कर सेवा करात विलिन करण्यात आला असून सिनेमा सेवा, ग्लॅम्ब्लींग, रेस अशांना आता 28 टेक्‍क्‍ दराने कर आकारणी केली जाणार आहे. पण लॉटरीव मात्र कोणतहीं कर आकारला जाणार नाही. सोने आणि अन्य किंमती धातुंवरील करांबाबत 3 जुन रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे असे जेटली यांनी सांगितले. ते म्हणाले की विविध वस्तू आणि सेवांबाबत करांची नव्याने जी रचना ठरवण्यात आली आहे त्यातून महागाई वाढणार नाही याची दक्षता आम्हीं घेतली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्‌सची कर रचन्रा
ज्या रेस्टॉरंट्‌सची वार्षिक उलाढाल 50 लाखांपेक्षा कमी आहे त्या हॉटेलांना पाच टक्के दराने कर आकारणी केली जाणार आहे. नॉन एसी हॉटेलातील बिलांवर 12 टक्के दराने तर दारू परवाना असलेल्या नॉन एसी हॉटेलांच्या बिलांवर 18 टक्के दराने कर आकारणी केली जाणार आहे. पंचतारांकित हॉटेलतील बिलांवर 28 टक्के कर आकारला जाईल. ज्या हॉटेल्स किंवा लॉजेसच्या खोलीचे दर 1000 रूपये किंवा त्यापेक्षा कमी असतील त्यांना करांतून वगळण्यात आले असून 1000 ते 2000 या दराने रूम भाडे आकारणाऱ्या हॉटेलांना 12 टक्के दरांनी आणि 2500 ते 5000 भाडे आकारणी करणाऱ्यांना हॉटेलांना 18 टक्के दराने कर लागू केला जाणार आहे. पाच हजार रूपयांपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या हॉटेलांना 28 टक्के दराने कर आकारणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)