“जीएसटी’चे टप्पे आता होणार केवळ तीनच

मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांची माहिती

कोलकाता – वस्तू आणि सेवा कर अर्थात “जीएसटी’च्या श्रेणींची संख्या आता तीन इतकी कमी केली जाईल. तर “जीएसटी’तून वगळलेल्या वस्तूंची वर्गवारीही यामध्ये समाविष्ट केली जाऊ शकते, असे अर्थमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“जीएसटी’च्या श्रेणींमध्ये 5 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, 12 आणि 18 टक्‍क्‍यांच्या श्रेणी एकत्र करून 15 टक्‍क्‍यांची मध्यवर्ती श्रेणी आणि 25 टक्‍क्‍यांची उच्च श्रेणी असू शकतील. असे सन्याल म्हणाले. भारत चेंबर ऑफ कॉमर्समध्ये आयोजित वार्तालापाच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

दीर्घकाळासाठी अधिकाधिक सोपेपणा आणण्यासाठी “जीएसटी’च्या दरांचे टप्पे कमी केले जाऊ शकतील. सध्या 5,12,18 आणि 28 टक्‍क्‍यांचे चार टप्पे आहेत. त्याशिवाय “जीएसटी’मधून वगळलेल्या म्हणजे शून्य टक्के “जीएसटी’लागू असलेली श्रेणीही आहे. नवीन श्रेणीरचनेनुसार बहुतेक वस्तूंचा समावेश 15 टक्‍क्‍यांच्या श्रेणीमध्येच केला जाऊ शकतो, असेही सन्याल म्हणाले.

या महिन्याच्या सुरुवातील बिहारचे उपमुख्यमंत्री आणि “जीएसटी’संदर्भातल्या उच्चस्तरिय समितीचे प्रमुख सुशिल मोदी यांनीही भविष्यात “जीएसटी’ चे टप्पे कमी होण्याचे सूतोवाच केले होते.

“जीएसटी’नंतर कायदेशीर आणि प्रशासकीय सुधारणा करण्याचीही सरकारची योजना आहे. करार लागू करण्यासाठी कायदेशीर व्यवस्था केली जाऊ शकत नाही. यामध्ये सुधारणा होणे आवश्‍यक आहे. प्रशासकीय सुधारणा देखील सरकारच्या रडारवर आहेत. भारतीय अर्थकारणाची गती मंदावली होती. मात्र आता त्यात सुधारणा होत आहेत, असे सन्याल म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)