जीएसटीची वर्षपुर्ती जोशात साजरी करणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने येत्या 1 जुलैला जीएसटी करप्रणालीची वर्षपुर्ती जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अर्थमंत्री अरूण जेटली यांचेही व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे भाषण होणार आहे. आंबेडकर भवन मध्ये हा कार्यक्रम होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 30 जुनला मध्यरात्री संसद भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात जीएसटी लागू करण्यात आली होती त्याला येत्या 1 जुलै रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. सध्या ही प्रणाली आता स्थीरावली असून देशातील 1 कोटी 11 लाख उद्योग व्यवसाय आस्थापनांनी जीएसटीसाठी नोंदणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)