जीएसटीची भीती बाळगू नका

कुलगुरू डॉ. कुलकर्णी : बारामतीत दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र

बारामती- आजवर भारतात अनेक प्रकारचे कर आकारले जात होते, शिवाय करांचे प्रमाण देखील कमी अधिक होते. काही करांमुळे वस्तूंची किंमत देखील वाढत होती. सर्वात त्रास दायक मुद्दा म्हणजे आजवर करावर कर भरावा लागत असे. केंद्र आणि राज्य यांचे मिळून एकूण 17 प्रकारचे विविध कर आपण भरत होतो. परंतु जीएसटी अंमलबजावणी नंतर एक देश एक कर झाल्याने यातील अडचण दूर झाली आहे. शिवाय यामध्ये नफेखोरी विरोधी कलम अंतर्भूत केले आहे; परंतु जीएसटी बद्दल भीती न बाळगता संपूर्ण कर प्रणाली समजून घेतली पाहिजे, असे आवाहन सरदार पटेल विद्यापीठ, आनंद, गुजरातचे कुलगुरू डॉ. शिरीष कुलकर्णीयांनी केले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात “न्यू एरा ऑफ जीएसटी अँड इट्‌स इम्प्लीकेशन इन इंडिया’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा उद्‌घाटनप्रसंगी कुलगुरू कुलकर्णी बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सदस्य मिलिंद शाह-वाघोलीकर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर, वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. जी. मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर म्हणाले की, अनेक वर्षांच्या विचारमंथनानंतर जीएसटीचा निर्णय घेण्यात आला. बदलांना सामोरे जाण्याची मानसिकता आपली नसते, तशी ती जीएसटी वेळी देखील नव्हती; परंतु उद्याच्या भारताच्या विकासात्मक भविष्यासाठी हा निर्णय अत्यंत गरजेचा होता. या चर्चासत्रासाठी राज्यातील 200 अभ्यासकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता गोरे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)