‘जीएसटी’चा वाटा राज्य सरकारनेच द्यावा

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाला वस्तू व सेवा करातील (जीएसटी) वाटा मिळावा, या मागणीसाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली. तसेच त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले.

कॅन्टोन्मेंट बोर्डांना “जीएसटी’तील वाटा हा राज्य शासनानेच द्यावा, अशी तरतूद “जीएसटी’ घटनेत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डांना राज्य शासनाकडून निधीचा वाटा मिळेल, अशी हमी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बोर्डाच्या लोकप्रतिनिधींना 3 जानेवारी रोजी दिली होती. त्यानुसार बोर्डाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मुख्यंमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, उपाध्यक्षा प्रियंका श्रीगिरी, नगरसेवक दिलीप गिरमकर, विनोद मथुरावाला, नगरसेविका रूपाली बिडकर यांचा समावेश होता.

डॉ. यादव म्हणाले, “जीएसटीचा वाटा राज्य सरकारच देईल, ही बाब अर्थमंत्री जेटली यांनी अधोरेखित केली आहे. त्यानुसार आम्ही मुख्यंमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. बोर्ड हद्दीतून सुमारे 1,500 कोटींचा निधी करापोटी वसूल करण्यात येतो. मात्र, त्याच ठिकाणी आज दैनंदिन गरजा पूर्ण होईल, इतकीही रक्कम शिल्लक नाही. अशा परिस्थितीत बोर्डाचा कारभार चालविणे बिकट होत आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)