जि.प. सदस्याच्या भावाला घरात घुसून मारहाण

मेढा – जावळी तालुक्‍यातील ओखवडी येथे जि. प. सदस्याच्या भावाला घरात घुसून जमावाने मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 10-15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. या घटनेनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश शेलार (रा. ओखवडी, ता. जावळी) यांनी फिर्याद दिली आहे.

दि. 1 रोजी पहाटे चारच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी हे घरात असताना आरोपी गोरख अशोक शेलार (रा. ओखवडी), दीपक दगडू पारटे (रा.पुनवडी), अभय शेलार (रा. भोगवली, ता. जावळी) व इतर 10 ते 15 जणांनी घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या पत्नीस मारहाण करून गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर शेजारी श्रीरंग शेलार यांच्या घराचे नुकसान केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)