जि.प.शाळेने पटकावला सभापती चषक

उरुळी कांचन- हवेली तालुक्‍यातील पहिला 1ली ते 4थी गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (टिळेकरवस्ती) विद्यार्थ्यांनी सभापती चषक पटकावला. या शाळेत डिजिटल बॅगलेस स्कूल, ऍक्‍सिजन पार्क, औषधी वनस्पती परसबाग, कुस्ती, स्केटींग, रायफल शूटींग, डान्स ऍकेडमी, अश्वारोहण, गांडूळखत, मत्स्यपालन प्रकल्प, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन, ई-लर्निंग प्रोजेक्‍ट, संगणक प्रशिक्षण, खडकवासला धरण प्रतिकृती, पवनक्की प्रकल्प, सूर्यनमस्कार व योग प्रशिक्षण, मुक्त वाचनालय पर्णकुटी (ओपन लायब्ररी ), कला व कार्यानुभव कार्यशाळा, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, धुळपाटी प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, भाजीपाला परसबाग, ठिबकसिंचन, मोगली प्लेस्टेशन, आकर्षक रंगरंगोटी असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे जि.प.शाळा शैक्षणिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आल्याने पाहिल्या सभापती चषकाचा बहुमान या शाळेला देण्यात आला. मुख्याध्यापक लिना शहा, उपशिक्षक राजेश दत्तात्रय काळभोर, विजय देवकर, बाळकृष्ण घाटे, आगळे तसेच टिळेकरवस्ती येथील ग्रामस्थ यांनी अथक प्रयत्न केले. तर, जि. प. सदस्या किर्ती काचंन, श्रीमती हेमलता बडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, ग्रामविकास अधिकारी कोळी तसेच पोलीस पाटील विजय टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र (परिन्दा) टिळेकर, संतोष टिळेकर, आबासाहेब टिळेकर, माणिकराव टिळेकर, आबासाहेब तांबे. शिक्षक गुणवंत गायकवाड व अजिता गांजाळे तसेच टिळेकरमळा येथील युवक बचत गटाने सहकार्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)