जि.प. शाळा दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ सुंदर आणि सुस्थितीत असलेल्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेता यावे. त्यामुळे मोडकळीश आलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदाच्या अंदाजपत्रकात भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मागीन अनेक महिन्यांपासून निधी अभावी रखडलेल्या शाळांच्या दुरूस्तीची कामे लवकरच मार्गी लागणार असून, विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.

काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत पडल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने खबरदारी घेत जिल्ह्यातील सर्व शाळांचा अहवाल मागविला होता. त्यानुसार शाळांच्या खोल्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शाळांच्या दुरूस्तीसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीसाठी वेळोवेळी पाठपूरावा केला. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांची दुरावस्था झाली असून उन्हाळा अथवा पावसाळ्यात वादळ वाऱ्यात शाळांचे पत्रे उडून जाणे, भिंती पडणे आदी घटना घडतात. त्यामुळे जिल्हा परिषदेने वेळीच याबाबतची काळजी घेतली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांची उभारणी झाल्यापासून दुरुस्तीसाठी अजून निधी उपलब्ध झाला नव्हता, मात्र, आता निधी उपलब्ध झाल्यामुळे शाळांची डागडूजी करता येणार आहे.

कोट
जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी 2 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मिळतो. मात्र यंदा जिल्हा नियोजन समितीकडून 9 कोटी 52 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून 352 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर निधी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेला मिळाल्यामुळे आनंद होत आहे. भरघोस निधी मिळाल्यामुळे शाळांच्या इमारती अधिक मजबूत करता येतील तसेच यापुढील काळात देखील असाच भरघोस निधी मिळविण्यासाठी निश्‍चित प्रयत्न केला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)