जिहे -कटापूर योजनेला जिवंत ठेवण्यात कॉंगेस व माजी मुुख्यमंत्र्यांचाच मोठा वाटा

डॉ सुरेश जाधव यांचा प्रसिध्दी पत्रकाद्वारे खुलासा

पुसेगाव, दि. 5 (वार्ताहर)- खटाव तालुक्‍याचे नंदनवन करणाऱ्या जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेला 226 कोटींचा निधी देऊन गती देण्याचे काम राज्याचे माजी मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.भाजप सरकार केवळ आयत्या पिठावर रेघोटया ओढण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप करून खटाव तालुक्‍याचे माजी तालुकाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांनी बंद पडणाऱ्या जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेला जिवंत ठेवण्यात कॉंग्रेसचाच मोठा वाटा असल्याचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
डॉ. सुरेश जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दुष्काळी खटाव-माण तालुक्‍याला हक्काचे पाणी मिळावे या करता सन 1989 मध्ये माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या गळी ही योजना उतरवून या योजनेचा सर्व्हे केला. त्यानंतर युती शासनाच्या काळात या योजनेला मान्यता मिळाली.दरवर्षी निधी देऊन काम सुरू ठेवले.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील अंदाजे 350 ते 400 योजनांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी ज्या सिंचन योजनांचे काम 25 % पेक्षा कमी झाले आहे त्या योजना बंद करणे व 70% ते 80 % पर्यंत ज्या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत त्याच योजनांना निधी देऊन त्या पूर्ण करण्याकडे शासनाचे लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळेच आजची ही जिहे कठापूर छउपसा सिंचन योजना खऱ्या अर्थाने जिंवत ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे. जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेचे काम त्यावेळी 25% पेक्षा कमी झालेले होते म्हणून ही योजना बंद करावी अशी शिफारस संबधित समितीने शासनाकडे केली होती .मात्र त्यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी जिहे कठापूर योजनेला गती देण्यासाठी 226 कोटींचा निधी तातडीने देऊन या योजनेच्या कामाला मुर्त स्वरूप प्राप्त करून दिले.या कामात आ.जयकुमार गोरे,आ.शशिकांत शिंदे यांचेही मोलाचे योगदान लाभले होते. या योजनेसाठी 800 कोटी चा निधी आणल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे. ही केवळ अफवा असून या भागातील जनतेची घोर फसवणूक केली जात आहे. जिहे कठापूर योजनेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली ही या भागातील जनतेसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.मात्र यावर्षी भाजपा सरकारने या योजनेसाठी केवळ 30 कोटीचा निधी देऊन जनतेची बोळवण केली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)