जिहे कटापूरच्या उपअभियंत्यावर चाकूने वार

बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या सेवा रस्त्यावरील थरार
सातारा, दि. 21 (प्रतिनिधी) – सकाळी व्यायाम करून चारचाकीने घरी जात असताना समोरून आलेल्या दोघांनी एकावर धारदार चाकूने हल्ला केल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. विजय विनोद मुंजाप्पा (वय 39, रा. आदित्यनगरी, खेड) असे जखमीचे नाव असून ते जिहे कटापूर योजनेचे इंजिनिअर असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले. उपलब्ध माहितीनुसार वार करणारे चारचाकी गाडीतून बॉंम्बे रेस्टॉरंट चौकाच्या दिशेने फरार झाले.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, विजय विनोद मुंजाप्पा हे नेहमीप्रमाणे बॉंम्बे रेस्टॉरंट चौकातील सेवारस्त्यावरून आदित्यनगरीच्या दिशेने जात होते. त्यावेळी महामार्गालगतच्या एका भंगारदुकानाच्या समोर त्यांच्या स्वीफ्ट गाडीसमोर दुसरी चारचाकी येऊन थांबली. मुंजाप्पा यांनी गाडीतून उतरून कोण आहे. याची खात्री करण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीतून कोणीच उतरले नाही. मुंजाप्पा पुन्हा स्वतःच्या गाडीकडे जात असताना मागील बाजूने अज्ञाताने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर धारधार शस्त्राने वार केला व त्यांनी अडवण्याच्या प्रयत्नात एक वार डाव्या हाताच्या बोटावर बसला. या घटनेनंतर वार करणारे चार चाकी गाडीने वेगाने बॉंम्बे रेस्टॉरंटच्या दिशेने निघून गेले. काही प्रत्यक्षदर्शी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मुुंजाप्पा यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. या घटनेची खबर पसरताच शासकीय वर्तुळात खळबळ उडाली. शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने घटना स्थळाची पाहणी केली. व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडला होता. शुक्रवारी सकाळी मुंजाप्पा चारचाकी कारमधून सातारा क्‍लबमध्ये व्यायामाला गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते कारमधून एक टेच निघाले होते. सकाळी पावणे आठच्या दरम्यान हा थरारक प्रकार घडला. मात्र काही कळायच्या आतच वार करणारे पळून गेले. पोलिसांनी फिर्यादी मुंजाप्पा यांची भेट घेऊन त्यांचा जबाब घेतला हा हल्ला नक्‍की कशासाठी झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. सहायक पोलिस निरीक्षक पवार अधिक तपास करत आहेत. शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमीवर उपचार सुरू असून घटनेचे कारण समोर आलेले नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)