जिल्ह्यासाठी नियोजनात ५८८ कोटींचा आराखडा

मंजूर निधीच्या योग्य नियोजनाचे पालकमंत्र्यांचे आदेश

नगर – जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्हा विकासासाठी मंजूर निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन करावे व निधी विहित मुदतीत खर्च करावा,अशा सूचना पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार संग्राम जगताप, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा.शिंदे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सर्व साधारण योजनेसाठी अहमदनगर जिल्हयाला सन 2017-18 साठी 569 कोटी 86 लाख 75 हजार मंजूर निधीपैकी 563 कोटी 57 लाख 77 हजार एवढा निधी खर्च झाला आहे. एकूण 98.90 टक्‍के खर्च झाला असून अहमदनगर जिल्हा निधी खर्चात अव्वल क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेत सन 2017-18 च्या पुनर्विनियोजन प्रस्तावाना यावेळी मान्यता देण्यात आली.

मंजूर निधी प्रस्तावित योजनांसाठी वेळेत खर्च करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत 588 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले.

जिल्हयातील हासोबा देवस्थान (सडे ता. राहुरी), शृंगेश्‍वर मंदिर देवस्थान (संवत्सर ता.कोपरगाव), श्री मारुती मंदिर ट्रस्ट (सावरगांव ता.पारनेर), ओम गुरुदेव जंगली महाराज मेरुदंड आश्रम देवस्थान (इमामपूर ता. नेवासा), श्री क्षेत्र काशी केंदारेश्‍वर देवस्थान (नागलवाडी ता. शेवगाव), श्री सिध्देश्‍वर महाराज देवस्थान (लिंपणगाव ता. श्रीगोंदे), श्री मुदगुलेश्‍वर मंदिर देवस्थान (आर्वी ता.श्रीगोंदे), श्री अंबिका माता देवस्थान (वांगदरी ता. श्रीगोंदे), खंडोबा देवस्थान (कौठे बुद्रुक ता. संगमनेर), श्री शेषनारायण देवस्थान (कुंभेफळ ता.अकोले), श्री महादेव व मारुती मंदिर (कुंभेफळ ता.अकोले), भैरवनाथ देवस्थान (कोंभळी ता.कर्जत), श्री पावन मारुती देवस्थान (शिंगवे केशव ता. पाथर्डी), श्री हंगेश्‍वर देवस्थान (हंगेवाडी ता. श्रीगोंदे), श्री क्षेत्र एकमुखी दत्त देवस्थान (जोर्वे ता. संगमनेर), श्री बिरोबा मंदिर देवस्थान (धांदरफळ खुर्द ता. संगमनेर), श्री नागनाथ महाराज देवस्थान (हिरडगाव ता. श्रीगोंदे), श्री चांडैश्‍वर देवस्थान (चांडगाव ता. श्रीगोंदे), श्री सिध्देश्‍वर (महादेव) महाराज देवस्थान (आढळगाव ता. श्रीगोंदे), श्री केदारेश्‍वर देवस्थान (सातेफळ ता.जामखेड), श्री शनि मंदिर गोगलगाव (ता. राहाता), रामगिरीबाबा देवस्थान (पाथर्डी) व दैवदैठण देवस्थान (जामखेड) या यात्रास्थळांना क-वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)