जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुसेगाव – पुसेगाव, खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 71 व्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या जनावरांच्या प्रदर्शनात 115 जातीवंत खिलार जनावरांचा सहभाग होता. यामध्ये गोरेगाव (पंढरपूर) येथील जावेद दिलावर मुलाणी यांच्या दोन दाती कालवडला श्री सेवागिरी चॅंपियन गाय व सोनके (पंढरपूर) येथील विठ्ठल बाबा बिचुकले यांच्या चारदाती खोंडाला श्री सेवागिरी चॅंपियन खोंड हा बहुमान मिळाला आहे. प्रदर्शनामध्ये विविध जातीच्या गायी व बैलाची निवड करण्यात येते. दुपारी 1 वाजता श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‌घाटन झाले.

या निवड समितीत सहआयुक्त डॉ. एस. माने, डॉ. इंगवले डॉ. शेलार, डॉ. डोईफोडे, डॉ. दुर्गादास उंडेगावकर, डॉ. विश्‍वास इनामदार, डॉ. अविराज राजे, विलास जाधव, शहाजी जाधव, दत्तात्रय देशमुख, वैभव जाधव, संदीप जाधव, राहुल जाधव यांचा समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आदत एक वर्षाखालील कालवड : अजय एकनाथ जाधव (भोसरे), आप्पासो शिवाजी घाडगे (बेंडीशेगाव), ओंकार विजय सुतार (ललगुण) रोहीत खंडू वायदंडे (मागीलपेठ मोहोळ). आदत एक वर्षावरील कालवड : अशोक विष्णू शिंदे (कान्हापुरी), नासीर इक्‍बाल शेख (नवलेवाडी), समृध्दी दादासो गलांडे (स्वरूपखानवाडी), महादेव भागवत इंगळे (उवहाळे, पंढरपूर ) दोन दाती कालवड : जावेद दिलावर मुलाणी (गारेगाव पंढरपूर), बाळासो नामदेव मुळे (उवडाळे, पंढरपूर), शंकर महादेव गोरे (कटगुण), तानाजी शिवाजी कदम (मापरवाडी). चार दाती कालवड : अभिजित पाडुरंग जानकर (कोर्टी, पंढरपूर), रोहीत तानाजी कदम (माफरवाडी), सुरज बाळकृष्ण आडेकर (इचलकरंजी). सहा दाती कालावड : सुर्यकांत महादेव गुरव (खातगुण), मारुती गेणा कारंडे (माहीम’ सांगोला), कार्तिक प्रकाश चव्हाण (भुरकवडी).

जुळीक गाय : विष्पू कृष्णात चव्हाण (नेर), सुर्यकांत एकनाथ भोसले (खातगुण), विकास मानसिंग जाधव (पुसेगाव).आदत एक वर्षाखालील खोंड : सुरज बाळकृष्ण आडेकर (इचलकरंजी), प्रताप शामराव झाजुर्णे (तडवळे), शब्बीर अहमद सय्यद (बुध), परवेज मुनीर मुलाणी (बुध). आदत एक वर्षावरील खोंड : विजय पाडुरंग सुतार (ललगुण), युवराज शंकर महाडीक (टेंबू), लक्ष्मण नाथा जाधव (सिध्देवाडी), दत्तात्रय तुकाराम बंडर (माहीम), शिवाजी बाबू घाडगे (बेडीशेगाव) दोन दाती खोंड : रामचंद्र नाथा जाधव (सिध्येबाडी, पंढरपूर), वामन तात्पाबा बंदपट्टे माजी नगराध्यक्ष (पंढरपूर), विलास मुगुटराव कदम (बोथे), शिवाजी दाजी गायकवाड (टाकळी, सिकंदर).

चार दाती खोंड : विठ्ठल बाबा बिचुकले (सोनके, पंढरपूर), शंकर विठोबा जगदाळे (चिलाईवाडी, पंढरपूर). सहा दाती खोंड : मल्हारी शंकर हाके (सोनके), महादेव पाहुरंग घाडगे (वरवंडे), विठ्ठल निवृत्ती बडंगर (माहीम), सागर शिवाजी गोसावी (शिंदेवाडी). कोसा खोंड एक वर्षावरील : लक्ष्मण दत्तात्रय जाधव (पुसेगाव), आदित्य लक्षण माने (धकटवाडी), सुमित अशोक शिंदे (कान्हापुरी), अतुल अंकुश घाडगे (ल्हासुर्णे). कोसा खोंड दोन दाती : तुकाराम निवृत्ती बंडगर (माहिम), दत्तात्रय प्रभाकर जाधव (खातगुण), योगेश विजय लावंड (खातगुण), बाबासाहेब दाजी गायकवाड (सिकंदर टाकणी), भाऊसाहेब सन्माबा आतुर (शिव नूर) ओपन कोसा गट खोंड : संतोष भिमराव शिंदे (बावडा), सुरेश शिवाजी घाडगे (ललगुण), धिरा संभाजी गरंडे (सांगोला), रमेश शिवाजी घाडगे (ललगुण),


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)