जिल्ह्याधिकाऱ्यांबरोबर तातडीने बैठक घ्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना

वासुंदे- दौंड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील खोर, पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणी गाडा, वासुंदे, लाळगेवाडी या दुष्काळी गावांचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला. या गावातील बहुतेक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी चारा डेपो आणि पाण्याच्या टॅंकरची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून या मागण्या संदर्भात तातडीने म्हणजे उद्याच (बुधवारी) बैठक आयोजित करण्यातबाबत खासदार सुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दौंड तालुक्‍यातील दुष्काळी गावांची पाहणी करताना खासदार सुळे यांनी पाणी टंचाईसह शेती, अन्नधान्य, शिक्षण आदी विषयांवरही ग्रामस्थांशी चर्चा केली. या आढावा दौऱ्यात खासदार सुळे यांच्या बरोबर माजी आमदार रमेश थोरात, सभापती झुंबर गायकवाड, तहसीलदार बालाजी सोमवंशी, पं. स.सदस्य नितीन दोरगे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, आप्पासाहेब पवार होते. प्रत्येक गावात बैठका घेऊन ग्रामस्थांशी दुष्काळावर चर्चा करुन उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या, याबाबत ग्रामतस्थांनी समाधान व्यक्त केले. टॅंकरने पाणी पुरवठा करतानाच फक्त माणसी 20 लीटर एवढे पाणी दिले जाते. तर, जनावरांसाठी यापूर्वी टॅंकरने पाणी दिले जात नव्हते, त्यासंदर्भात पाणी देण्यात यावे, अशाही सुचना खासदार सुळे यांनी केल्या.
यावर्षी पाऊस झाला नसल्याने काही गावातील ग्रामस्थांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून या गावांतील पाण्यासाठी तातडीने टॅंकर उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालू करण्यात याव्यात तसेच आणि गावातील तलावात पाणी सोडण्यात यावे व जनावरांनसाठी चारा छावणी सुरू करण्यात यावी, आशा मागण्या यावेळी दुष्काळी गावतील ग्रामस्थांनी सुळे यांच्याकडे केल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)