जिल्ह्यात 8 नगरपंचायती, 9 पालिकांचे कामकाज ठप्प

सातारा – महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना तसेच राज्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून दिनांक 1 जानेवारी 2019 पासून नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केल्याने सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिका व आठ नगरपंचायतींचे काम कोलमडून पडले. या आंदोलनात जिल्ह्यातील 1076 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता . विविध ठिकाणच्या पालिका कार्यक्षेत्रात कर्मचारी संघटनांनी दैनंदिन कामकाज बंद ठेउन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे एक हजार कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत नगरपालिका व नगरपंचायतीना वगळण्यात आल्याने राज्यस्तरावर पालिकाकर्मचारी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यभर पालिकांचे कामकाज मंगळवारी दिवसभर ठप्प राहिल्याने राज्य शासन व कर्मचारी संघटना यांच्यात तातडीने वाटाघाटी सुरू झाल्याचे मुंबईवरून विश्‍वसनीय वृत्त आहे. नगरविकास विभाग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याने काही सकारात्मक निर्णय होतील अशी आशा आहे.मात्र पालिका कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे जिल्हयातील विषय समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात 1076 कर्मचाऱ्यांचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असा दावा संघटनेच्या सूत्रांनी केला.

यावेळी दीपक रोडे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सुभाष मोरे पुणे विभाग प्रदेश उपाध्यक्ष,अनिल पवार पुणे विभाग अध्यक्ष, विकास लगारे कार्याध्यक्ष पुणे विभाग, नौशाद जावळे संघटक पुणे विभाग, अभिजीत गोरे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)