जिल्ह्यात 61 लाख साखर पोत्यांचे उत्पादन

कोपरगाव – जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी 8 जानेवारीपर्यंत 58 लाख 31 हजार 548 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून 60 लाख 75 हजार 915 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. दैनंदिन साखर उतारा 11.15 टक्के आहे.

अंबालिका कारखान्यात सर्वाधिक उसाचे गाळप केले गेले आहे. सरासरी साखर उताऱ्यात सहकार महर्षी नागवडे साखर कारखान्यांचा सर्वाधिक 11.03 टक्के उतारा आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांनी केलेले ऊस गाळप, साखर पोती, उतारा आकडेवारी पुढीलप्रमाणे – अंबालिका 8 लाख 20 हजार 625 मे. टन., 8 लाख 70 हजार 650 पोती (11.60), साईकृपा 1 लाख 44 हजार 420 मे. टन, 1 लाख 46 हजार 700 पोती, क्रांती शुगर 1 लाख 1 हजार 955, 1 लाख 10 हजार 100 (11.60), गंगामाई 4 लाख 57 हजार 900, 4 लाख 63 हजार 150 (11.15), गणेश 1 लाख 23 हजार 500, 1 लाख 165 हजार 675 (10.13), अशोक 2 लाख 32 हजार 760, 2 लाख 38 हजार 450 (11.78), कुकडी 3 लाख 84 हजार 50. 4 लाख 15 हजार 550 (11.42), वृद्धेश्‍वर 1 लाख 93 हजार 910, 1 लाख 96 हजार 400 (10.71), अगस्ती 2 लाख 68 हजार 338, 2 लाख 87 हजार 80 (11.65), मुळा 4 लाख 68 हजार 530, 4 लाख 77 हजार 550 (11.12), ज्ञानेश्‍वर 5 लाख 44 हजार 565, 5 लाख 83 हजार 900 (11.54), सहकार महर्षी नागवडे 3 लाख 73 हजार 585, 4 लाख 7 हजार 450 (11.37), तनपुरे राहुरी 1 लाख 57 हजार 177, 1 लाख 69 हजार 250 (12.22), सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात 5 लाख 43 हजार 800, 5 लाख 89 हजार 610 (11.60), पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रवरानगर 4 लाख 17 हजार 600, 4 लाख 23 हजार 600 (11.20), कर्मवीर काळे कोळपेवाडी 2 लाख 91 हजार 941, 2 लाख 93 हजार 400 (11.31), सहकार महर्षी कोल्हे 3 लाख 6 हजार 892, 2 लाख 86 हजार 400 (9.61) याप्रमाणे गाळप केले आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढल्याने उस तोडणी कामगारांना त्याचा त्रास जास्त प्रमाणात होत आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)