पुणे जिल्ह्यात 140 मतदान केंद्रे वाढणार

जिल्हा प्रशासनाचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव

पुणे – मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात 140 मतदान केंद्र वाढणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये मतदारांच्या नाव, पत्यांमधील दुरुस्ती, दुबार नावे वगळण्याबरोबरच नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयांमध्ये सुद्धा मतदार नाव नोंदविण्यासाठी मोहीम राबविली होती. यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले.

दरम्यान, मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरी भागात 1,400 मतदारांसाठी एक केंद्र, तर ग्रामीण भागात 1,200 मतदारांसाठी एक केंद्र असावे, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण 140 मतदान केंद्रे वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या 7 हजार 666 होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)