जिल्ह्यात लाचखोरीत महसूल खाते आघाडीवर

पळशी – सरकारी कार्यालयांत नागरिकांची कामे करून देण्यासाठी लाच घेण्यात जिल्ह्यात यंदाही महसूल विभागाने नेहमीप्रमाणे “अव्वल’ क्रमांक राखला आहे. त्याखालोखाल शिस्तीचे दल अशी ओळख असलेल्या खाकी वर्दीवाल्यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ह्यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय आणि पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. लाचलुचपतने यावर्षी 29 कारवाया केल्या असून 37 लाचखोरांना गजाआड केले आहे.

सरकारी कार्यालयात एखाद्या कामासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करूनही अनेक लहान मोठे सरकारी अधिकारी व कर्मचारी कामांसाठी पैशाची मागणी करतात. भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते. लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार दिल्यानंतर सापळा रचून या विभागाकडून लाचखोराला रंगेहाथ पकडले जाते. सरकारी कार्यालयात लाच घेतल्याशिवाय कामे होत नसल्याने सामान्य नागरिकांची सातत्याने अडवणूक केली जाते. लाच घेताना स्थळेही बदलली जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही अधिकारी व कर्मचारी लाच घेण्यास पंटरही नेमतात. सर्वसामान्यांचा महसूल व पोलिस खात्याची जास्त संबंध असल्याने लाच घेण्यात हे विभाग आघाडीवर आहेत. यावर्षी महसूल खाते प्रथम क्रमांकावर असून 12 कारवायात 15 जणांना गजाआड केले आहे. खाकी वर्दी दुसऱ्या नंबरवर असून 7 कारवायात 8 जणांना गजाआड केले आहे.

ग्रामविकास खाते तिसऱ्या क्रमांकावर असून 5 कारवायात 7 जणांना गजाआड केले आहे. विधी व न्याय खाते चौथ्या क्रमांकावर असून 2 कारवायात 2 जणांना गजाआड केले आहे. शिक्षण, वीज व अन्न औषध प्रशासन खात्यानेही पाठीमागे नंबर लावला आहे. अशा प्रकारे या वर्षातील कारवाई लाचलुचपत विभागाने केली आहे. यंदादेखील तितक्‍याच कारवाया करण्यात आल्या. वर्षभरात झालेल्या या कारवाया पोलीस अधीक्षक संदीप दीवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के व पोलीस निरीक्षक आरिफ मुल्ला आणि लाचलुचपत विभागातील कर्मचारी यांनी केल्या आहेत.त्यामुळे त्यांचही सर्वत्र कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)