जिल्ह्यात रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी पोलीस सक्रीय

पाबळ- बारामती येथील विद्यालयीन युवतीच्या आत्महत्या प्रकरणातून रोडरोमिओच्या बंदोबस्तासाठी पोलीस खाते सक्रीय झाले आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.14) पाबळ येथील पद्ममनी जैन महाविद्यालय आणि भैरवनाथ विद्यालयात विशेष चौकशी केली. तसेच विद्यार्थिनींशी संवाद साधला.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ पाबळचे अध्यक्ष भगवान घोडेकर, खजिनदार सोपान जाधव, प्राचार्य संजय घोडेकर, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी राजेंद्र घनवट, मधुकर खिलारे, संतोष पिंगळे, महिला पोलीस एन.एस घोडके, के.एन.सात्रस, प्रा.भवारी, चौधरी, बेग, शेटे, अविनाश क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी शाळा महाविद्यालय परिसरात अचानक भेटी देणे, सार्वजनिक आणि रोडरोमिओंची विशिष्ठ ठिकाणी सतत वॉच, संबंधित विद्यालयाचे सीसीटीव्ही कनेक्‍शन शिक्रापूर पोलीस स्टेशनला जोडणे, निर्भय पथकामार्फत दर आठवड्याला मुलींशी संवाद साधणे, वाहनाचे परवाने तपासणे, कारवाईत सातत्य ठेवणे आदी उपाययोजताना मोबाईल मेसेजच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची ताबडतोब दखल घेताना गोपनीय पद्धतीने मुलींशी संपर्क ठेवून कठोर कारवाई करण्याचे संकेत विद्यार्थिनींना देण्यात आले आहेत. तर विद्यार्थ्यांनीही उपद्रवी मुलांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात आले.

  • न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा
    निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी सोशल मिडियाच्या माधमातून होत असलेल्या फसवणुकीची सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थिनींना कोणत्याही संकटाची (रोडरोमियो, बस, विद्यालय तसेच अगदी घरातूनही) माहिती एसएमएसद्वारे द्यावी. तुमचे नाव गुप्त ठेवून त्वरित कारवाई करण्यात येईल, असे सांगून एस. एन. घोडके 7767070146 आणि के. एन. सात्रस 9158652520 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळून विद्यार्थिनींसह महिला शिक्षिकानीही क्रमांक लिहून घेतले.
  • …तर त्रास देणाऱ्यांवर कारवाई करू
    भैरवनाथ विद्यालयातील कार्यक्रमात ज्या विद्यार्थिनीने एका सडकहरीला कानाखाली आवाज काढत मराठीत चांगलेच समजावल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दिवटे यांचे हस्ते त्या विद्यार्थिनिचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मुलींनी पाबळ परिसरातिल कोणत्या ठिकाणी असे कंपू असतात. बस मध्ये कोण त्रास देतो? कोण वाहने अंगावर घालतो ? अशा विद्यालयीन आणि विद्यालय बाहेरील टग्यांची सखोल माहिती पोलिसांना द्यावी. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
  • मुली करतात प्राध्यापकांकडे तक्रार
    पद्ममणी जैन महाविद्यालयातील एक प्राध्यापिकेने मुली आमच्याकडे तक्रार करण्याऐवजी प्राध्यापकांकडे करतात, अशी माहिती दिली. तर नाव न सांगण्याचे अटीवर, काही शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचे हितसंबंधी’ आवारात विनाकारण येणार नाहीत. याचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त करून चारचाकीधारक कर्मचाऱ्यांची वाहने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात तर प्राध्यापकांची वाहने शेडमध्ये असल्याचा पुरावाच पुढे केला. त्यावर एका संचालकाने यावर शिस्त लावण्यात येईल अशी माहिती दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)