शेतकरी चिंतेत:जनावरांचे व्यापारी पोलिसांच्या रडारवर
सातारा- जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात घरफोडीचे सत्र कायम असतानाच आता म्हशी चोरट्यांच्या टोळीची भर पडली आहे. साताऱ्यात एका महिन्यात तब्ब्ल 15 हून अधिक म्हशींची चोरी झाली. याप्रकरणी सातारा शहर, कराड, वडूज,बोरगाव या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत.

साताऱ्यात घरफोडीने आणि चोरींच्या घटनांनी नागरिक आणि पोलिसही हैराण आहेत. सातारा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी घरफोडी आणि चोरीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. त्यातच सातारकर आणि पोलिसांना आता म्हशी चोरी करणाऱ्या टोळीचे आव्हान निर्माण झाले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून म्हशी चोरी करणाऱ्या टोळीने जिल्ह्यातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे.

पंधराहुन अधिक म्हशींची चोरी करण्यात आली आहे. वडूज,निनाम,माहूली या परिसरात हा प्रकार घडला आहे. तर गेल्या महिन्याभरापासून सातारा जिल्ह्यातील अनेक भागात म्हशी चोरीच्या घटना घडल्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबांचा आधार असणाऱ्या या म्हशी कुठे भर दिवसा तर कुठे रात्री चोरटे हातोहात लंपास करत आहेत. म्हशी चोरी करणाऱ्या या टोळ्या टोळी मोठ्या गाड्या, टेंम्पो,पिकअप सारख्या गाड्यांचा वापर चोरीसाठी करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हैराण झाले असून या म्हशी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी लवकर छडा लावावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)