जिल्ह्यात प्रलंबित कृषी पंप कनेक्‍शन देण्यास सुरूवात

विद्युत मंडळ संचालक विश्‍वास पाठक यांची माहिती

सातारा – जिल्ह्यात साडे अकरा हजार कृषी पंपांना वीज कनेक्‍शन देणे प्रलंबित होते. आता कनेक्‍शन देण्यासाठी सरकारने 224 कोटी रूपयांची तरतूद देखील केली असून अत्तापर्यंत 7000 प्रलंबित कनेक्‍शन दिले आहेत व येत्या वर्षभरात सर्वांना कनेक्‍शन देण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्‍वास पाठक यांनी दिली.

महावितरणच्या चार वर्षाचा वाटचालीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी प्रकल्प संचालक संजय ताकसांडे, बारामती मंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे उपस्थित होते. पुढे बोलताना पाठक म्हणाले, मागील चार वर्षात साडे पाच लाख कृषी पंपांना वीज कनेक्‍शन देण्यात आली असून त्यामध्ये विदर्भ व मराठवाड्याचा अनुषेश असल्यामुळे त्या ठीकाणी प्राधान्याने कनेक्‍शन द्यावे लागले.

-Ads-

मात्र, आता प.महाराष्ट्रात प्रलंबित कनेक्‍शन देण्यास सुरूवात केली असून आता थेट ट्रान्सफार्मरमधून कनेक्‍शन देण्यात येणार आहेत. जेणे करून शेतकऱ्यांना दर्जेदार वीज तर मिळणार आहेच आणि ट्रान्सफार्मरची देखभाल देखील शेतकऱ्याकडून होणार असल्याने अडथळे निर्माण होणार नाहीत. तसेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर जास्त असल्याच्या मुद्दयावर पाठक म्हणाले, महाराष्ट्रात ही स्वस्त दराने वीज देता येवू शकेल मात्र त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कर रूपाने नागरिकांवरच होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)