सातारा – दूध आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात दूध संकलनामध्ये कामलीची घट झाली होती. मात्र, मंगळवारी सायंकाळी व बुधवारी सकाळी झालेल्या दूध संकलनामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वाढ होण्यामागे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी दूध संकलन केवळ 3 लाख 88 हजार लीटर झाले होते तर सायंकाळी 5 लाख 66 हजार लीटर झाले होते. बुधवारी सकाळी ही दूध संकलनामध्ये वाढ कायम राहिली. बुधवारी सकाळी 4 लाख 41 हजार लीटर दूध संकलन झाले आहे. मात्र, ही सरासरी रोज होणाऱ्या संकलनाच्या तुलनेत 28 टक्के असली तरी आंदोलनाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत 17 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. संकलनाची स्थिती असताना साताऱ्यासह प्रमुख शहरांमध्ये पॅकेटमध्ये येणाऱ्या दूधामध्ये घट कायम असल्याचे दिसून आले. रोजच्या तुलनेत 30 टक्केच पॅकेटचे दूध शहरांमध्ये आले होते. त्यामध्ये गायीच्या दूधाचे प्रमाण अधिक तर म्हैसीच्या दूधाचे प्रमाण अल्प होते. गेली तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा तसा कोणताही प्रभाव सातारा शहरातील नागरिकांवर अद्याप जाणवून आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)