जिल्ह्यातील 862 ग्रामपंचायती होणार ब्रॉडबॅंडने ‘कनेक्‍ट’

पुणे- देशात इंटरनेटचे जाळे वेगाने पसरले असून, आता एका क्‍लिकवर पाहिजे ती माहिती मिळत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. असे असताना ग्रामीण भागांतही हे जाळे पसरले असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीही यात मागे पडू नये यासाठी 862 ग्रामपंचायती “ब्रॉडबॅंड सेवेने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायती एकमेकांशी जोडल्या जाणार असून, त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

“बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वातून या ब्रॉडबॅंड सेवेचे काम होणार असून, त्यासाठी 3 कोटी 59 लाख 96 हजारांची रक्कम प्रशासनाकडून मंजूर झाली आहे. या पैकी 86 लाख 59 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याचे काम सुरू झाले असून लवकरच या सर्व ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. दरम्यान, इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आहे त्या जागेवर बसून पाहिजे ती माहिती काही क्षणात आपल्याला मिळवता येते किंवा पोहोचवता येते. या इंटरनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीही “कनेक्‍ट’ व्हाव्या यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सोपा व्हावा, तसेच कामातील गती वाढविण्यासाठी इंटरनेटद्वारे ग्रामपंचायती जोडण्यात यावी, यासाठी शासनाने ब्रॉडबॅंड सेवा देण्यासाठी केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यातील 862 ग्रामपंचायती सेवेने जोडण्यात येणार आहेत. 3 कोटी 59 लाख 96 हजार मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 86 लाख 59 लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत या कामासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. बांधा, वापरा आणि हस्तातरित करा, या तत्वाने हे काम केले जाणार आहे. ही कामे एक किंवा दोन वर्षांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रॉडबॅंड सेवेमुळे कामांना मिळणार गती
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एखादे काम करायचे म्हटले की प्रत्येकवेळी कागदी घोडे नाचविले जातात. मात्र, ते काम मार्गी लावण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद याठिकाणी जावे लागत असल्यामुळे कामांना विलंब होत असे. मात्र, ब्रॉडबॅंड सेवेमुळे सर्व ग्रामपंचायती एकमेकांना कनेक्‍ट होणार असून, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांनाही त्या कनेक्‍ट राहणार आहेत. त्यामुळे कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)