जिल्ह्यातील 64 कारखान्यांनी गाळप परवाने मागितले

File Photo

पुणे – पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या गळीत हंगामासाठी राज्यातील तब्बल 195 साखर कारखान्यांनी गाळप परवाने मागितले आहेत. त्यात पुण्यातील तब्बल 64 कारखान्यांचा समावेश आहे.

दरवर्षी गाळप हंगामाचे परवाने देण्याचे काम हे साखर आयुक्‍तालयाच्या वतीने केले जाते. गेल्या वर्षी 187 साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले होते. 2017-18 मधील गाळप हंगामासाठी राज्यात उसाचे क्षेत्र हे 9 लाख 2 हजार हेक्‍टर होते. यंदाच्या 2018-19 च्या हंगामासाठी राज्यात 11 लाख 62 हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस आहे. तब्बल 2 लाख 60 हेक्‍टर ऊस जास्त आहे. पुणे विभागातील पुणे सोलापूर व सातारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 4 लाख 14 हजार 233 हेक्‍टरवर ऊस असून या विभागातील 64 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती साखर आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आली.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)