जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत

पुणे – नव्याने अस्तित्वात आलेल्या आणि मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्यासाठी 25 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यातील सहा तालुक्‍यातील 22 गावांतील कार्यकर्ते आणि नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभाग प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 21 जानेवारीला प्रसिद्ध करणार आहे. त्यावर दि.23 जानेवारीपर्यत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार असून, दि.25 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये इंदापूर तालुक्‍यातील लुमेवडी, शिरसाटवाडी, अवसरी, भाटनिमगाव व निरनिमगाव ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खेड तालुक्‍यातील गुळाणी, रौधळवाडी, आसखेड (बु), आंबेठाण, वाशेरे, सायगाव व कडाचीवाडी ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. मुळशीतील रावडे, पोमगाव, भुगाव, मारणेवाडी, कुंभेरी व दारवली ग्रामपंचायतींचा समावेश असून, वेल्हा तालुक्‍यातील सुरवड व वडगांव झांजे गावांत निवडणुकी रंगणार आहेत. शिरूरमधील कासारी व दौंड तालुक्‍यातील एकरेवाडी ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)