जिल्ह्यातील 13 लाख विद्यार्थ्यांना रुबेला लस देणार

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने : पिरंगुट येथे जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन

पिरंगुट, दि. 26 (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यातील 13 लाख विद्यार्थ्यांना रुबेला लस देणार आहे. या लसीकरणामुळे कोणताही त्रास होणार नाही. देश पोलिओ मुक्त झाला त्याचबरोबर देश रुबेला मुक्त करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील संस्कार प्रायमरी स्कुलच्या वतीने गोवर रुबेला (एमआर) जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या बक्षीसवितरण प्रसंगी डॉ. माने बोलत होते. या मॅरेथॉनमध्ये 200 विद्यार्थी व 100 पालक सहभागी झाले होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर, माजी सभापती व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, पौडचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक रेखा दुधभाते, उपसरपंच दिलीप पवळे, ज्ञानेश्‍वर पवळे, दीपक गोळे, अंकुश नलावडे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र गोळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक कल्याण निधीचे उपाध्यक्ष बंडू दातीर, शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पवळे, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस रविंद्र गोळे, उद्योजक विजय पवळे, शाळेचे अध्यक्ष शिवाजी साठे, शाळेच्या प्राचार्या स्नेहा साठे आदी मान्यवर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
डॉ. अजित कारंजकर म्हणाले की, रुबेला हा धोकादायक आहे. मात्र योग्यवेळी हे लसीकरण केल्याने धोका टाळता येतो. परिणामी भावी पिढी अधिक सक्षम व निरोगी होईल. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. संतोष गावडे तर शिवाजी साठे यांनी आभार मानले.

  • गटनिहाय तीन विजेते;
    लहान गट (इयत्ता पहिली-दुसरी) मुले: स्वराज काशिलकर, विराज सातपुते, अभिषेक खांडवे. मुली : नंदिता सपकाळ, अफसाना खिलजे, नेत्रा हरगणे. मोठा गट (इयत्ता तिसरी ते सहावी) मुले : प्रवीण देवासी, श्रेयश निकटे, वरद सुतार. मुली : श्रेया खानेकर, श्रावणी खानेकर, श्रावणी पवळे. पालक (महिला) : कविता मुंडे, सोनाली राजपूत, भाग्यश्री जाधव. पुरुष : सुखदेव नांदे, संपत प्रजापती, रामनिवास चौधरी. खुला गट : संग्राम दिंडे, शेखर शेंडगे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)