जिल्ह्यातील सात तीर्थक्षेत्र, चार पर्यटनस्थळांना “क’ दर्जा

शासनाचा मुबलक निधी मिळणार : विकासाच्या अडचणी दूर

राजगुरुनगर- पुणे जिल्ह्यात 7 तीर्थक्षेत्र स्थळांना “क’ दर्जा मिळाला आहे, तर चार ठिकाणी पर्यटनस्थळांना “क’ दर्जाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विकासासाठी शासनाचा मुबलक निधी मिळण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत.
दरम्यान, खेड तालुक्‍यातील कडधे येथील खंडोबा देवस्थानास “क’ वर्ग तीर्थक्षेत्रास मान्यता मिळाली. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कडधे येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवस्थानाला शासनाच्या क वर्ग तीर्थक्षेत्रास अखेर मान्यता मिळाली आहे. कडधे ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. देवस्थानला “क’ दर्जा मिळाल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काढले असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांनी दिली.
दिलीप मेदगे यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी दुसऱ्यांदा निवड झाली त्यानिमित्ताने ग्रामस्थांनी सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी जयराम नाईकडे, सरपंच जिजाभाऊ नाईकडे, बाळासाहेब मिरजी दिनकर देवदरे, केतन चव्हाण आदी ग्रामस्थांनी श्री खंडोबा देवस्थानला “क’ दर्जा मिळण्यासाठी दिलीप मेदगे यांच्याकडे मागणी केली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना वारंवार भेटून व पत्रव्यवहार करून देवस्थानला “क’ दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले अखेर त्यास यश आले. कडधे येथील प्रसिद्ध श्री खंडोबा मंदिरासाठी दानशूर लोकांनी यापूर्वी मोठी मदत करून सुमारे चार कोटी रुपये पर्यंतची कामे पूर्ण केली आहेत. कडधे गावातील ओरियटल बॅंकेचे युनियन अध्यक्ष शंकर देवदरे, वन खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी रंगनाथ नाईकडे, श्री गुरव गुरुजी आदिनी स्वतःच्या वैयक्तिक काही लाखांच्या देणग्या दिल्या व भाविकांच्या पैशांतून सभामंडप भोजन कक्ष, संरक्षक भिंत, कॉंक्रीट रस्ता, वाहनतळ अशी मोठी कामे केली. यापुढील काळात भाविकांसाठी शौचालय, स्नानगृह पाण्याची लाईन, वाहनतळ व इतर कामे शासनाच्या निधीतून करण्यासाठी आम्ही या विश्‍वस्तांना मदत करणार आहोत. पालकमंत्री नामदार गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, केंभावी साहेब, नवनाथ खांडवे तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, जिप गटनेते शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, बाबाजी काळे, तनुजा घनवट यांच्या माध्यमातून मंदिर परिसराची विविध कामे केली जाणार असल्याचे मेदगे यांनी सांगितले.
चौकट : जिल्ह्यातील सात तीर्थस्थळास “क’ दर्जा मिळालेली ठिकाणे :
दौंड तालुका : खंडोबा देवस्थान (बेलवंडी), भानोबा देवस्थान (पुसेगाव), नागेश्‍वर देवस्थान (पाटस).
पुरंदर तालुका: पांडेश्‍वर मंदिर (जेजुरी), श्रीक्षेत्र कोळविहिरे येथील डोंगराचे आई.
बारामती तालुका : श्रीक्षेत्र ढगाई देवी (होळ).
खेड तालुका : श्री खंडोबा देवस्थान (कडधे)
“क’ वर्ग पर्यटनस्थळांची मान्यता मिळालेली ठिकाणे
पुणे शहर: पाषाण तलाव, म्हातोबा मंदिर देवस्थान, श्री सद्‌गुरु जंगली महाराज मंदिर
खेड तालुका : कुंडेश्‍वर डोंगर वनदेव मंदिर, कोहिंडे बुद्रुक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)