जिल्ह्यातील विकासकामांचे “जिओ टॅगिंग’ सुरू

प्रत्येक कामाचा तपशील मिळण्यास होणार मदत

पुणे – 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. परंतू, त्यातील किती कामे पूर्ण झाली, किती अपूर्ण आहे. सद्यस्थितीत कामाची परिस्थिती काय आहे, याचा लेखाजोखा मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना आदेशानुसार जिल्ह्यात विकासकामांचे “जिओ टॅंगिंग’ करण्यास सुरूवात केली आहे.

जिल्हा परिषदेला 14 व्या वित्त आयोगातील मोठया प्रमाणावर निधी येतो. हा निधी जिल्हा परिषदेचा मुख्य स्रोत असून, या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील कामांना गती मिळण्यास मदत होते. त्यामध्ये ग्रामपंचायत विभागाला 50 टक्के निधी दिला जातो. त्यानुसार मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. 2016-17 मध्ये तीन हजार, तर 2017-18 मध्ये साडेतीन हजार विकासकामे करण्यात आली आहे. या कामांचे “जिओ टॅगिंग’ करण्याण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला असून त्यानुसार संबधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्‍यात स्वतंत्र यंत्रणा उभी करून “जिओ टॅगिंग’ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामाचा तपशील मिळण्यास मदत होणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)